
The Art of War (Marathi Edition)
Échec de l'ajout au panier.
Échec de l'ajout à la liste d'envies.
Échec de la suppression de la liste d’envies.
Échec du suivi du balado
Ne plus suivre le balado a échoué
Acheter pour 2,66 $
-
Narrateur(s):
-
Sachin Suresh
-
Auteur(s):
-
Sun Tzu
À propos de cet audio
लौकिकार्थाने फारसा प्रसिद्ध नसलेला, सैन्यातील अधिकारी व त्याचबरोबर पंडित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सन त्झु नावाच्या चिनी व्यक्तीने ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचे शीर्षक वाचल्यास हे पुस्तक युद्धात वापरायच्या डावपेचांबद्दल आहे असे वरकरणी वाटते. हे पुस्तक क्रौर्यास उत्तेजन देते असाही एक लोकप्रिय आणि प्रचलित असा गैरसमज आहे;परंतु हे खरे नाही.
एवढेच नाही तर पुस्तकाचे नाव ‘दी आर्ट ऑफ वॉर’ असूनही हे पुस्तक युद्धशास्त्राबद्दल नाही तर हे पुस्तक नीतिमत्तेबद्दल, सहिष्णुतेबद्दल आहे. जीवनात संघर्षाचा सामना करावा लागला तरीही आक्रमक भूमिका न घेता संघर्ष कसा टाळावा, उभय पक्षांची हानी टाळून कशा प्रकारे मार्ग काढावा याबद्दल प्रकांड विचारशीलता आणि बुद्धिमत्तेचा वापर करीत सल्ला दिला आहे.
हे पुस्तक इतके जुने असूनही त्याने आपला कालातीतपणा सिद्ध केला आहे. आजही त्याचा अभ्यास जगभरातील सैनिकी विद्यालयांत केला जातो. यातील डावपेच, युद्धातील परिस्थितीबरोबरच इतर पार्श्वभूमीवर व युद्धेतर परिस्थितीतदेखील परिणामकारक सिद्ध होतात.
तुमच्या तीव्र स्पर्धात्मक जीवनात संघर्ष हाताळण्याचा परिणामकारक, आध्यात्मिक व सहानुभूतीपूर्ण मार्ग शिकायचा असेल, जीवनातील ध्येयाची स्पष्ट अनुभूती करून घ्यायची असेल व अत्यंत बिकट परिस्थितीतही मनःशांती अनुभवायची असेल तर ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
Please note: This audiobook is in Marathi.
©2024 Translation by Saket Prakashan Pvt. Ltd. (P)2024 Audible Singapore Private Limited