OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE. Obtenez 3 mois à 0,99 $/mois. Profiter de l'offre.
Page de couverture de ब्राह्मण पत्नी आणि काळे तिळ

ब्राह्मण पत्नी आणि काळे तिळ

ब्राह्मण पत्नी आणि काळे तिळ

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

एका नगरात एक ब्राह्मण राहत होता. एका पहाटे ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला , आज दक्षिणायन संक्रांत आहे , आज दान केल्याने चांगले फळ मिळते मी याच आशेने जात आहे. आज तू एखाद्या ब्राह्मणाला भोजन दे. हे ऐकून ब्राह्मण पत्नी म्हणाली , तुम्हाला हे सगळं सांगताना लाज नाही का वाटत? या गरिबाच्या घरात आहेच काय ज्यातून कुणाला भोजन देऊ शकतो ? ना आपल्याकडे वापरायला चांगले कपडे आहेत , ना सोनं- चांदी . आपण कोणाला काय दान देणार ? पत्नीचं हे कठोर बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला, "तुझं हे असं बोलणं योग्य नाही. धन तर आजपर्यंत कोणालाच नाही मिळालं, आपल्याकडे जे काही आहे त्यातंलच थोडंफार कोण्या गरजूला देणं हेच खरं दान असतं. पतीच्या अश्या समजावण्याने पत्नी म्हणाली, ठीक आहे . घरात थोडे तीळ ठेवले आहेत, मी त्यांची सालं काढते आणि त्यातूनच काही बनवून त्या ब्राह्मणाला भोजन देईन. पत्नीकडून आश्वासन मिळाल्यावर ब्राह्मण दुसर्‍या गावी दान घेण्यासाठी निघून गेला. इकडे ब्राह्मण पत्नी ने तीळ कुटले, धुतले आणि सुकवण्यासाठी उन्हात ठेऊन दिले. तेव्हाच एका कुत्र्याने सुकत घातलेल्या तिळांवर लघवी केली. आता ब्राह्मण पत्नी विचार करू लागली, 'हे तर दुष्काळात तेरावा महिना असं झालं. आता मी कोणालातरी हे धुतलेले तीळ देऊन त्या बदल्यात न धुतलेले तीळ घेऊन येते.' Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Pas encore de commentaire