OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE. Obtenez 3 mois à 0,99 $/mois. Profiter de l'offre.
Page de couverture de लोभी गिधाड

लोभी गिधाड

लोभी गिधाड

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

एकदा एक शिकारी घनदाट जंगलात शिकार करायला गेला. तेवढ्यात त्याची नजर एका काळ्याभोर रानडुकरावर पडली. शिकाऱ्याने आपल्या बाणाने त्याच्यावर हल्ला केला. जखमी डुक्करही वळले आणि शिकाऱ्याच्या छातीमध्ये त्याने आपली शिंगे घुसवली. अशा रीतीने रानडुकराचा बाण लागल्यामुळे मृत्यू झाला आणि शिकारीही रानडुकराच्या शिंगाच्या वाराने मरण पावला. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेलं एक गिधाड तिथे आलं आणि दोघांनाही मेलेले पाहून त्यानं स्वतः च्या नशिबाचं कौतुक केलं आणि म्हणालं , आज देव माझ्यावर प्रसन्न झाला आहे असं दिसतंय म्हणून तर न मागता न भटकंती करता इतकं अन्न मला मिळालं. आणि मग गिधाडाने विचार केला,आता मला हे अन्न नीट पुरवून पुरवून खाल्लं पाहिजे ज्यामुळे माझी गाडी यावरच जास्त काळ चालेल आणि मला अन्नाच्या शोधात जास्त भटकावं लागणार नाही तेव्हा मी या शिकार्‍याच्या धनुष्याला जोडलेली हि दोरी खाऊनच माझी भूक भागवतो असा विचार करून गिधाड धनुष्याची दोरी तोंडात घालून खाणार एवढ्यात ताणल्यामुळे ती दोरी तुटली. आणि धनुष्याचा वरचा भाग गिधाडाच्या छातीत घुसला त्यासरशी तो जोरात ओरडून ,खाली पडला आणि मेला Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Pas encore de commentaire