OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE. Obtenez 3 mois à 0,99 $/mois. Profiter de l'offre.
Page de couverture de "विणकराचे धन"

"विणकराचे धन"

"विणकराचे धन"

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

सोमिलक नावाचा एक विणकर, जो एका गावात राहत होता, तो एक उच्च दर्जाचा कलाकार होता. तो राजांसाठी उत्तम कपडे विणत असे, पण तरीही तो सामान्य विणकरांइतका पैसा कमवू शकला नाही. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे व्यथित होऊन एके दिवशी सोमिलक आपल्या पत्नीला म्हणाले, "प्रिये ! देवाची ही काय लीला आहे की सामान्य विणकरही माझ्यापेक्षा जास्त कमावतो. मला वाटते की कदाचित ही जागा माझ्यासाठी योग्य नाही, म्हणून मला दुसऱ्या ठिकाणी जाऊन माझे नशीब आजमावायचे आहे.” अर्थस्योपार्जनं कृत्वा नैव भोगं समश्नुते। अरण्यं महदासाद्य मूढः सोमिलको यथा॥ संपत्ती प्राप्त करूनही काही लोक त्याचा उपभोग घेऊ शकत नाहीत, पहा कशा प्रकारे मूर्ख सोमिलक भरपूर धन कमवूनही शेवटी गरीबच राहिला. सोमिलाकची बायको म्हणाली, “तुम्ही असा विचार करणं योग्य नाही. भलेही मेरू पर्वतावर जा किंवा मरुस्थलामध्ये राहायला जा, तुम्ही जिथे वाटेल तिथे जा परंतु एक लक्षात घ्या तुम्ही कमावलेल्या धनाचा तुम्ही योग्य वापर केला नाही तर ते धन निघून जाते. यासाठी मला वाटतं की तुम्ही तुमचं काम इथे राहूनच करावं. विणकर म्हणाला, "प्रिये ! मी तुझ्या मताशी सहमत नाही. कष्ट करून कोणीही आपले नशीब बदलू शकतो. म्हणूनच मी नक्कीच दुसऱ्या देशात जाईन." असा विचार करून सोमिलक दुसऱ्या शहरात गेला आणि अधिक कार्यक्षमतेने काम करू लागला . काही काळातच त्याने तीनशे सोन्याची नाणी कमावली. मग ती सोन्याची नाणी घेऊन तो आपल्या घराकडे निघाला. वाटेत सूर्यास्त झाल्यावर वन्य प्राण्यांपासून बचावासाठी तो झाडाच्या फांदीवर झोपला. मध्यरात्री त्याने भाग्य आणि पुरुषार्थ नावाच्या दोन व्यक्तींचे बोलणे ऐकले. भाग्य पुरुषार्थाला म्हणाला, जर तुला माहितीये की या विणकाराच्या नशिबात धन नाहीये तर तू त्याला तीनशे मुद्रा का देऊ केल्यास? पुरुषार्थ त्याला म्हणाला, मला त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळवून द्यायचं होतं याउपर तुला सगळंच माहीत आहे. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Pas encore de commentaire