OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE. Obtenez 3 mois à 0,99 $/mois. Profiter de l'offre.
Page de couverture de सकाळ तनिष्का | Sakal Tanishka

सकाळ तनिष्का | Sakal Tanishka

सकाळ तनिष्का | Sakal Tanishka

Auteur(s): Sakal Media
Écouter gratuitement

À propos de cet audio

मेकअपपासून मनीमॅटर्सपर्यंत महिलांविषयक सगळ्या गोष्टी ऐकता येतील, सकाळ तनिष्का पॉडकास्टमध्ये. एखाद्या लाडक्या अभिनेत्रीचा प्रवास असेल नाहीतर उद्योजिकेचा संघर्ष, नवं करिअर असेल किंवा एखादं साहस, कधी नातेसंबंधांविषयीचा सल्ला... सगळंच ऐकता येईल सकाळ तनिष्का पॉडकास्ट या व्यासपीठावरून. Développement personnel Gestion et leadership Relations Réussite Sciences sociales Économie
Épisodes
  • EP 8 : इंजिनीअर ते इन्फ्लुएन्सर शुभांगीचा सुरेल प्रवास
    Oct 22 2023
    आयआयटीची तयारी करताकरता शुभांगी केदार गाण्याकडे वळली. केवळ आवड असलेलं गाणं तिच्या करिअरची निवड बनलं. पण एकदा ठरवल्यानंतर मात्र शुभांगीने मागे वळून पाहिलं नाही. आपल्या आवाजाच्या जोरावर स्ट्रगल करत ही मुलगी सोशल मीडियाचा चेहरा बनली. गंमत म्हणून सुरू केलेलं यू ट्युब चॅनेल ते आजचा सोशल मीडिया इन्फ्लुए्सर असा प्रवास सांगते, गायिका शुभांगी केदार. सकाळ तनिष्का पॉडकास्टमध्ये. तिच्याशी गप्पा मारल्या आहेत, स्वाती केतकर-पंडित यांनी.
    Voir plus Voir moins
    26 min
  • EP 7 : मूर्ती आणि मेकॅनिक्स दोन्हीत रस असणारी भूपाली निसळ
    Oct 21 2023
    इंजिनीअर तर अनेकजणी होतात पण त्या ज्ञानाचा वापर करून कारखाना उघडणाऱ्या फार कमी असतात. नगरची भूपाली निसळ त्यातलीच एक. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या या मुलीचा मूर्तीशास्त्राचा अभ्याससुद्धा आहे, इतकंच नव्हे तर त्याविषयी दोन पुस्तकंही प्रकाशित झालीयेत. हे कमी की काय म्हणून ती तबला विशारद आहे आणि सामाजिक कामातही पुढे असते... नगरच्या भूपाली निसळचा हा बहुरंगी, बहुढंगी प्रवास ऐका, सकाळ पॉडकास्टमध्ये... संवाद साधला आहे, स्वाती केतकर-पंडित हिने
    Voir plus Voir moins
    32 min
  • EP 6 : सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून सामाजिक चळवळ घडवणाऱ्या स्वाती बेडेकर
    Oct 20 2023
    मूळच्या विज्ञान शिक्षिका असलेल्या स्वातीताई सॅनिटरी पॅड निर्मिती व्यवसायात तशा अपघातानेच उतरल्या पण त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन सोडला नाही. उलट या दृष्टीकोनालाच साधन बनवून गुजरात, राजस्थान, हरियाणा इथल्या अगदी दुर्गम भागातल्या महिलांबरोबर त्यांनी मासिक पाळीविषयक शास्त्रीय माहितीची चळवळ उभारली. फक्त महिलाच नव्हेत तर या भागांतल्या पुरुषांनाही याविषयी माहिती देणाऱ्या बडोद्याच्या स्वाती बेडेकर या बेन विथ अ ब्रेन ठरल्या आहेत. त्याच्याशी गप्पा मारल्या आहेत, स्वाती केतकर-पंडित हिने
    Voir plus Voir moins
    30 min
Pas encore de commentaire