OFFRE D'UNE DURÉE LIMITÉE. Obtenez 3 mois à 0,99 $/mois. Profiter de l'offre.
Page de couverture de Episode 1 - The Silver Effect - चंदेरी इफेक्ट

Episode 1 - The Silver Effect - चंदेरी इफेक्ट

Episode 1 - The Silver Effect - चंदेरी इफेक्ट

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या पॉडकास्ट Money Minute मध्ये!


आज बोलूया अशा धातूबद्दल, ज्याची चमक सध्या सगळ्यांच्या नजरेत भरतेय — चांदी!


या वर्षी, म्हणजेच २०२५ मध्ये, चांदीच्या किंमतींनी तब्बल ८०% वाढ दाखवलीये —

१९८० नंतरचा हा सगळ्यात मोठा उछाल आहे!

पण प्रश्न असा — हे होतंय तरी का?


कारण स्पष्ट आहे — पुरवठ्याची कमतरता आणि गुंतवणूकदारांचा FOMO, म्हणजे Fear of Missing Out!

जागतिक बाजारात सध्या backwardation दिसतेय — म्हणजे फ्युचर किंमती, स्पॉट किंमतींपेक्षा कमी आहेत.

याचा अर्थ — सध्या मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे.


आता भारताकडे वळूया —

आपली बहुतांश चांदी इम्पोर्टेड असते, त्यामुळे आपले दर जागतिक बाजाराशी जोडलेले असतात.

पण सध्या भारतात चांदीचे दर आंतरराष्ट्रीय किंमतींपेक्षा जास्त आहेत.


कारण — स्थानिक पुरवठ्याची कमतरता आणि स्पेक्युलेशन.

इतकंच नाही, Silver ETFs आणि Silver Funds पण प्रीमियमवर ट्रेड होत आहेत.


पण एक गोष्ट लक्षात ठेवा —

चांदी हा एक अत्यंत अस्थिर म्हणजेच volatile ऍसेट आहे!

१९८० मध्ये चांदी ४ महिन्यांत ७८% पडली होती, आणि २०११ मध्ये ४४% घसरली.


म्हणून गुंतवणूक करताना थोडं सावध राहा.


तर हा होता आजचा Silver Update!

लक्षात ठेवा — सगळं चमकणारं सोनं नसतं… काही वेळा ती चांदी पेटलेली असते!


पुन्हा भेटू पुढच्या भागात — तोपर्यंत समजून गुंतवा, शहाणपणाने गुंतवा!


Silver Updates.

The Money Minute Podcast by Yogesh Chinchole.


Let's Learn Investing & Personal Finance in Simplified Way!

Pas encore de commentaire