Page de couverture de Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

Auteur(s): Ep.Log Media
Écouter gratuitement

À propos de cet audio

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा..

संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.

सृजन सख्या ची माहिती
विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.

2025 Ep.Log Media Pvt. Ltd. | All Rights Reserved
Hindouisme Monde Spiritualité
Épisodes
  • आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..
    Mar 22 2023

    सर्वात प्रथम हिंदु नववर्षदिनाच्या सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा !!! गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' या पॉडकास्ट मालिकेची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात आम्ही ह्या मालिकेअंतर्गत २६ भाग सादर केले. यातील प्रत्येक भागात हिंदू सणांची, उत्सव, परंपरांची आणि त्याचबरोबर काही राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या दिनविशेषांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक भाग सादर करताना आम्हाला पुस्तके, ग्रंथ, काही मान्यवर व्यक्ती आणि अर्थातच एपिलॉग मीडियाचे अभिजीतसर, रोहन व सर्व तंत्रज्ञ यांची मदत झाली. त्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. ह्या आमच्या पॉडकास्ट मालिकेतील सर्व भागांविषयी संक्षेपात माहिती देण्याचा प्रयत्न, आम्ही ह्या शेवटच्या भागात केला आहे. आम्हाला खात्री आहे, की, ही माहिती ऐकल्यावर जर तुम्ही आजपर्यंत यापैकी कोणताही भाग मिस केला असाल, तर तो नक्कीच ऐकाल आणि सर्व सणांची माहिती नक्की एन्जॉय कराल... याच नोटवर आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद🙏

    सहभाग -
    डॉक्टर सौ. स्वाती कर्वे, सरोज करमरकर,
    अपर्णा मोडक.

    See omnystudio.com/listener for privacy information.

    Voir plus Voir moins
    20 min
  • होळी रे होळी, पुरणाची पोळी
    Mar 6 2023

    नमस्कार श्रोतेहो,
    तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
    मनातील सर्व राग-रुसवे , हेवेदावे विसरून आनंदाने हिंदू नववर्षाची सुरुवात पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने करावी असे सांगणारा हा होळीचा सण .. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा.. होळी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा. जागोजागी संध्याकाळी पेटवलेल्या होळ्या, नैवेद्याला खुसखुशीत पुरणपोळी ही ह्या सणाची खासियत. त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे धुलीवंदन आणि पंचमीला येते ती रंगपंचमी ... वसंत ऋतूत येणारा, रंगांची उधळण करणारा हा सण लहान-थोर साऱ्यांच्याच आवडीचा...या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या पॉडकास्ट मधून. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात कसा साजरा केला जातो याबद्दलही ऐकूया.
    सादरकर्त्या ... अपर्णा, सरोज आणि वैद्या स्वाती...
    मग नक्की ऐका...

    संकल्पना व सहभाग -
    सौ.अपर्णा मोडक
    वैद्या स्वाती कर्वे
    सौ.सरोज करमरकर

    See omnystudio.com/listener for privacy information.

    Voir plus Voir moins
    12 min
  • जननी जन्मभूमी, स्वर्ग से महान है
    Jan 26 2023

    भारतामध्ये 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन - एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतो. देशभरात सर्वत्र ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हटले जाते. ज्या हजारो देशभक्तांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते , त्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान केला जातो.
    या दिवशी ,भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
    ह्या संचलनाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची माहिती या पॉडकास्ट मधून आपणास मिळेल.
    बीटिंग द रिट्रीट ‎या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता केली जाते .
    'जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है' ह्या आजच्या पाॅडकास्टच्या माध्यमातून, आपल्या देशातील शहिदांना मानवंदना देऊया.
    याचबरोबर माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंती आणि महाशिवरात्र ह्या उत्सवांबद्दलही थोडी माहिती जाणून घेऊया.

    संकल्पना व सहभाग -
    वैद्या स्वाती कर्वे,
    सौ.अपर्णा मोडक,
    सौ.सरोज करमरकर

    See omnystudio.com/listener for privacy information.

    Voir plus Voir moins
    9 min
Pas encore de commentaire