Épisodes

  • RAJ'KARAN PODCAST | भास्कर जाधव, सतेज पाटील
    Oct 31 2025
    विधानसभा आणि विधान परिषद या राज्यातील दोन्ही सभागृहांमध्ये सध्या विरोधी पक्षनेता नाही. सत्ताधारी पक्षांकडून किमान १० टक्के सदस्यसंख्येकडे लक्ष वेधले जात आहे, तर विरोधी पक्षांकडून आतापर्यंतच्या परंपरेची उदाहरणे दिली जात आहेत. राज्यासमोर सध्या अतिवृष्टी, बेरोजगारी, महागाई, आरक्षणाचे वाद यांसारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत. अशा काळात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे. विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवून राज्याच्या प्रगतीला खीळ घालण्याचा हा प्रकार आहे. KEYWORDS: Political Podcast, Marathi Politics, Indian Politics 2025, Maharashtra Politics, Rajkaran Podcast, Political Discussions, Maharashtra Political Updates, Political Analysis India, Shivsena, Shivsena UBT, BJP, Congress
    Voir plus Voir moins
    11 min
  • RAJ'KARAN PODCAST | BMC निवडणूक ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई!
    Oct 24 2025
    राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेतील घडामोडींवर केंद्रित झाले आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, परंतु मागील दशकात भाजपची ताकदही लक्षणीयरीत्या वाढली आहे. आता शिवसेनेतील फूटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही निवडणूक सावरण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, प्रभागरचनेमध्ये सोयीप्रमाणे बदल केल्याचा आरोप होत असून, त्यातूनच महापालिका निवडणुकीतील संघर्षाची बीजे रुजताना दिसत आहेत. KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Local Body Election, Maharashtra Election, BMC Election, Shivsena, Shivsena UBT, BJP
    Voir plus Voir moins
    11 min
  • RAJ'KARAN PODCAST | अतिवृष्टीमुळे भाजप टेन्शनमध्ये : निवडणुका जिंकण्याचे आव्हान
    Oct 17 2025
    पूरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या तर आधी महापालिका निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेशी युती केली तरी अन्य महापालिकांत भाजपला मित्रपक्षाची गरज नाही. स्वबळावरच निवडणुका लढविल्यास पक्षाला जास्त फायदा होऊ शकतो, अशी कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांची भावना आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युतीचा विषय लांबणीवर पडलेला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Local Body Election, Maharashtra Election, BJP, Devendra Fadnavis
    Voir plus Voir moins
    11 min
  • RAJ'KARAN PODCAST | धुमसणाऱ्या लडाखमधील भडका, ऐका भुमिपुत्राच्या तोंडून...
    Oct 10 2025
    लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी नुकतेच तेथे मोठे आंदोलन झाले. लडाखचे संकट संपलेले नसून, ते अद्याप कायम आहे. लडाखच्या जनतेसाठी सोनम वांगचुक यांची भूमिका, त्यांचे ठाम राहणे सरकारने मांडलेल्या रचितकथनापेक्षा अधिक वजनदार आहे. लडाखमधील नागरिकांचा त्यांच्या आंदोलनाला आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा कायम आहे. तो का आहे? आणि हा भडका नेमका का पडला? याबाबत सरकारनामासाठी लिहिले आहे, श्रीनगरच्या जावेद मात्झी यांनी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Ladakh, Ladakh Issue, BJP, National Issue in india
    Voir plus Voir moins
    12 min
  • RAJ'KARAN PODCAST | संघर्षात निवड ते सुप्रिया सुळेंचं राजकीय लॉन्चिंग : शरद पवार यांना नाशिक नेहमीच जवळचे का वाटते?
    Oct 3 2025
    नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) नुकतेच प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. तसेच कांदाप्रश्नी आक्रोश मोर्चाही आयोजित केला होता. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश देणाऱ्या नाशिकमध्ये विधानसभेत मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही. शरद पवार यांना नाशिक जिल्ह्याने सातत्याने साथ दिली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महायुतीला शह देण्यासाठी पवारांनी नाशिकची निवड केली. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Nashik, NCP, Sharad Pawar.
    Voir plus Voir moins
    12 min
  • RAJ'KARAN PODCAST | महाराष्ट्राच्या सुरक्षाव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलणारा मराठमोळा अधिकारी...
    Sep 26 2025
    पोलिस दलात उच्च पदांवर असलेले अनेक जण न्यायाची, सत्याची कास धरण्यात, कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात, कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडतात. पण सदानंद दाते यांच्यासारखे काही त्यास अपवाद आहेत. घटनेचा मान राखण्याची शपथ तंतोतंत पाळणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये दाते यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
    Voir plus Voir moins
    8 min
  • RAJ'KARAN PODCAST | एकनाथ शिंदेंचा 'बाण' कोणाच्या वर्मी लागणार?
    Sep 19 2025
    गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा झाला. लोकसभेत मराठवाड्यातील एकमेव खासदार आणि विधानसभेत जिल्ह्यात सहा आमदार असे घवघवीत यश मिळाल्यानंतर शिंदे तब्बल 14 महिन्यानंतर संभाजीनगरच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आले. अर्थात निमित्त होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्वतयारी आणि पक्षांतर्गत कुरबुरी थांबवण्यासाठीचा खटाटोप.
    Voir plus Voir moins
    10 min
  • RAJ'KARAN PODCAST | देवेंद्र फडणवीस 'मराठा' समाजाचे नवे राजकीय नायक?
    Sep 12 2025
    मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मुंबईत का धडकले, सरकारने आंदोलकांना थोपविण्यासाठी काय प्रयत्न केले, मुंबईतील मराठा आंदोलन सरकारने कशा पद्धतीने हाताळले... या सर्वच प्रश्नांवर चर्चा करण्याची गरज आहे. आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी एकीकडे प्रशासकीय यंत्रणा मार्ग काढत असताना राजकीय पातळीवर आंदोलन कसे हाताळले गेले, हेही तपासणे गरजेचे आहे.
    Voir plus Voir moins
    8 min