Épisodes

  • मराठी मालिका भाग 2: डायबेटीक रेटीनोपॅथी - मधुमेह व्याधीमुळे डोळ्यावर होणारे परिणाम त्याचे उपचार व उपाययोजना
    Jul 23 2022

    मधुमेह हा आजार भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मधुमेह रुग्ण असणारा देश आहे. तर अशा ह्या मधुमेही रुग्णांना अनेक समस्या असतात त्यातील खूप महत्त्वाची समस्या म्हणजे मधुमेहामुळे दृष्टीपटल किंवा डोळ्यावर होणारे परिणाम. या भागामध्ये   डायबेटीक रेटीनोपॅथी म्हणजे काय त्यावर असणारे उपचार व घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन पुणे येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ 

    डॉ. अनिल दूधभाते हे करणार आहेत. डॉ. अनिल दूधभाते हे एमबीबीएस एम एस नेत्र रोग तज्ज्ञ आहेत. दूधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर या त्यांच्या रुग्णालयाचे ते डायरेक्टर आहेत. दूधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर हे  महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नेत्र रुग्णालयापैकी एक असून या ठिकाणी सर्व अद्ययावत उपकरणे व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचे हे नेत्रालय सिंहगड रोड पुणे येथे आहे तसेच त्याची एक शाखा नांदेड सिटी पुणे येथे आहे. डॉ. अनिल दूधभाते यांनी आजपर्यंत अत्यंत क्लिष्ट व दुर्मिळ अशा अनेक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. डोळ्यांच्या  डायबेटीक रेटीनोपॅथी म्हणजेच मधुमेह आजारामुळे डोळ्यावर होणारे दुष्परिणाम त्यावर असणारे उपचार व घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या भागामध्ये केले गेले आहे. 

    या माहितीमुळे नक्कीच सर्व श्रोत्यांना याविषयी ज्ञान मिळेल व हा भाग सर्वांना निश्चितच आवडेल.

    तुम्हाला या विषयावर अजून काही जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही खालील मेल आयडी वर संपर्क करू शकता contact@biourbexer.com

    Voir plus Voir moins
    20 min
  • मराठी मालिका -भाग १: यकृत विषयी चे आजार --यकृत विषयी कुठले आजार आहेत आणि त्यांचा प्रतिबंध कसा करावा.
    Jul 12 2022

    आपल्या सर्वाच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, आपली सतत बदलत चाललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अल्कोहोल पिण्याचे वाढलेले प्रमाण या सर्व कारणामुळे यकृत विषयी चे आजार वाढत आहेत. तरुणां मध्ये याचे प्रमाण जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

    या मराठी मालिकेतील पाहिल्या भागात पुणे येथील प्रसिद्ध पोटविकार आणि यकृत विकार तज्ञ डॉ. दादासाहेब मैंदाड सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ दादासाहेब मैंदाड यांचे पुणे येथे स्वतःचे नेक्स्टजेन जी. आय. सेंटर सातारा रोड आणि सिंहगड रोड या ठिकाणी क्लिनिकस आहेत.

    डॉ दादासाहेब मैंदाड हे पुणे येथील भारती विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेज येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. तसेच पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालये जसे रुबी हॉल क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल येथे पोटविकार आणि यकृत विकार तज्ञ म्हणून ते काम करीत आहेत.

    ते आपणास आज विविध यकृत विषयी आजार व आपले यकृत सुदृढ आणि निरोगी कसे ठेवता येईल याबद्दल या भागात माहिती देणार आहेत. नक्कीच या भागातील त्यांच्या मार्गदर्शन मुळे सर्व श्रोत्याच्या ज्ञानात भर पडेल आणि सर्वाना ही मालिका निश्चीतच आवडेल.

    तुम्हाला या विषयावर अजून काही जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही खालील मेल आयडी वर संपर्क करू शकता

    contact@biourbexer.com

    Voir plus Voir moins
    13 min