Page de couverture de Maharashtrachi Lokdhara - Vol. 1

Maharashtrachi Lokdhara - Vol. 1

Maharashtrachi Lokdhara - Vol. 1

Écouter gratuitement

Voir les détails du balado

À propos de cet audio

महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यकमाने त्यांच्या जीवनात एक मोठे यश आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची कल्पना यामागे होती. कार्यकमाचे मूळ नाव ‘महाराष्ट्र (स्व) भावदर्शन’ असे होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हे नाव नंतर देण्यात आले. देवदत्त, वसुं धरा, यशोधरा आणि चारुशीला ह्या शाहिरांच्या चार मुलांनी ह्या कार्यकमासाठी अपार कष्ट घेतले. देवदत्ताने कार्यकमाचे संगीतदिग्दर्शन केले. चारुशीला साबळे हिने प्रत्येक कलाप्रकारामागच्या परंपरेचा मागोवा घेऊन ह्या कार्यकमात विविधता आणली. कलाविष्कारातील लयबद्घता, नृत्याविष्कार, वेशभूषा, कलावंतांची योजना यांचे नेमके भान ठेवून सादरीकरणात तोचतोपणा येणार नाही ह्याची काळजी घेतली. यशोधरा हिनेही ह्या कार्यकमाच्या निर्मितीत पडद्यामागच्या व्यवस्थापनाचा महत्त्वाचा वाटा उचलला होता.

‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यकमातून लावणी, कोकेवाला (गामीण भागात सारंगीसारखे वाद्य वाजवून देवादिकांची आख्याने गाणारा ), बाल्यानृत्य (मुंबईत उपाहारगृहांत, धनिकांकडे, तसेच चाळींतील लोकांकडे कामाला असलेल्या कोकणी गड्यांचे–बाल्यांचे–नृत्य), कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन घडविण्यात आले.

प्रेक्षकांच्या सोयीसाठी आणि प्रयोगकर्त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शाहिरांनी फिरत्या नाट्यगृहाची (मोबाइल थिएटर) संकल्पना साकार केली. प्रसिद्घ नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर ह्यांनी तांत्रिकदृष्ट्या लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य त्यांना दिले. फिरता रंगमंच वाहून नेणारे वाहन कोल्हापूरचे यंत्रमहर्षी म्हादबा मेस्त्री यांनी बांधून दिले. विस्तृत रंगमंच १,५०० ते २,५०० खुर्च्या टाकण्याची सोय रंगमंचाच्या भोवती कनाती लावून तयार होणारे प्रेक्षागृह इ. ह्या फिरत्या नाट्यगृहात होते. ही सर्व व्यवस्था घडीची (फोल्डिंग) होती. हा उपकम उत्तम असला, तरी अनेक कारणांमुळे तो पुढे बंद करावा लागला.

Pas encore de commentaire