Épisodes

  • # 1809: “तिकिटासाठी सात रुपये तेवढे द्या." लेखक : राजेंद्र जगदाळे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jul 18 2025

    Send us a text

    दहिवडी बसस्थानकावर तिकिटासाठी ७ रुपये नसल्याने तिष्ठत बसलेले धनाजी जगदाळे यांना ४०,००० रुपयांचे बंडल सापडले. हे पैसे प्रामाणिकपणे परत करत मनाने धनवान असलेला धनाजीने ते बक्षीस नाकारले. म्हणाला, " तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले". आणि फक्त तिकिटासाठी ७ रुपयेच घेतले.
    ही केवळ प्रामाणिकतेची गोष्ट नाही, तर माणुसकीचीही आहे!

    Voir plus Voir moins
    4 min
  • # 1808: "पेन्शन" लेखक अमोल अ. पवार. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jul 12 2025

    Send us a text

    सकासकाळी, बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत, हुज्जत घालत होती. तिचं एकच म्हणणं होतं,

    "तुम्हीच खाताय माझे पैसे."

    अमरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयांच्या नोटा काढून दिल्या.ती क्षणभर गोंधळली. दीड वर्ष सरलं. दर महिन्याला ती तिच्या हक्काच्या पेन्शनचे अमरनाथकडून पैसे घेत राहिली…

    मुख्य साहेबांनी तिला खरं सांगितलं.

    “आज्जी, तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षांपूर्वीच बंद झाली आहे.अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे. आज त्यांना अपघात झालाय.” .......

    लेखक: अमोल अ. पवार, उंब्रज. 9970773576; 079727 85133

    Voir plus Voir moins
    7 min
  • # 1807: "देव जेव्हा आजारी पडतो....." लेखक रवी वाळेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jul 11 2025

    Send us a text

    ओडिशात अगदी निर्मनुष्य जंगलात पडझड झालेले पुरातन मंदिर असले तरी तिथे गाभाऱ्यात दिवा तेवत असलेला दिसतोच दिसतो! चैत्र - वैशाखाच्या कडकडीत उन्हाच्या तडाख्याने सगळे ओडिशा त्रस्त झालेले असते. प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेले महाप्रभू शेवटी पुरीच्या राजाला निरोप पाठवतात, "मला थंड पाण्याने स्नान करायची इच्छा आहे!" मग मोकळ्या हवेत, सकाळी सकाळी, विहिरीच्या १०८ हंडे थंड पाण्याने स्नान केल्याने त्याच दिवशी जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा ह्या तिघाही भावंडाना ज्वर चढतो! …..




    Voir plus Voir moins
    15 min
  • #1806: "टोमण्यांची शाब्दिक हिंसा." लेखिका डॉ. प्रतिभा जाधव. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ).m4a
    Jul 10 2025

    Send us a text

    आज नेहमीप्रमाणे ती कामावर आली. टोमणे मारणाऱ्या गटाचा म्होरक्या काही अश्लील बोलत तिच्या पुढे गेला तशी ही वेगाने त्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली. आसपासच्या सर्वांनीच श्वास रोखले. त्याच्याही लक्षात यायच्या आत तिने त्याच्या दोन थोबाडीत मारल्या. सर्वत्र स्मशान शांतता पसरली .

    "गेले अनेक महिने हकनाक तुमचा मानसिक छळ मी सोसते आहे. तो आज थांबेल ही अपेक्षा आहे थांबल्यास पुढील कायदेशीर प्रक्रियेस सामोरे जायची तयारी ठेवा. कदाचित तुम्हाला महिला कायदे वा सक्षम महिलेची क्षमता ठाऊक नसेल पण मी संविधान मानणारी आणि जाणणारी बाई आहे हे लक्षात ठेवा." ती उद्गारली.

    Voir plus Voir moins
    7 min
  • # 1805: द्रौपदीचे जांभूळ आख्यान. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jul 8 2025

    Send us a text

    द्रौपदीला इतिहासाने आणि धर्मशास्त्राने तिला 'पतिव्रता' म्हणून मान्यता दिली.

    आख्यानकर असे सांगतात की ,

    कुठल्याशा समारंभाच्या वेळी तेजस्वी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला.. त्याचं देखणेपण, तेज, व्यक्तिमत्त्व पाहून ती क्षणभर मोहीत झाली..

    क्षणभर तिच्या मनात विचार आला – हा सहावा पांडव असता तर?

    Voir plus Voir moins
    5 min
  • # 1804: "विठ्ठल विठ्ठल गजरी"..संत चोखामेळा. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jul 7 2025

    Send us a text

    विठ्ठल भक्तीची ही भक्तिरसपूर्ण लोककथा आहे.

    संत चोखामेळा यांना सामाजिक बंधनामुळे त्यांना आत जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नव्हता . रात्री गाढ झोपेत असताना त्यांच्या घरी पांडुरंग आले. त्यांनी चोखोबांना जागे केले आणि हाताला धरुन मंदिराच्या गाभाऱ्यात नेले. तेथे देव त्यांच्याशी गुजगोष्टी करीत बसले. आपल्या कंठीचा हार त्यांच्या गळी घातला. तो प्रसिद्ध अभंग...

    धांव घालीं विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥

    Voir plus Voir moins
    9 min
  • # 1803: फिरुनी नवी जन्मेन मी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 6 2025

    Send us a text

    शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला. आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होतं. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, “अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटं सोडणार नाही! तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन!”

    Voir plus Voir moins
    12 min
  • # 1802: चिमुरडी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 5 2025

    Send us a text

    ते रोजच्या प्रमाणे किराणा दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडं पाय मोकळे करायला निघाले होते. इतक्यात एक गोड, कोवळी हाक आली —
    "काका… काका…"
    ते वळाले.
    ७-८ वर्षांची एक चिमुरडी, धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती.
    "काय झालं गं... एवढी धावत आलीस?"
    काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं.
    "काका... पंधरा रुपयांचे तांदूळ आणि दहा रुपयांची डाळ घ्यायची होती..."
    मुलीच्या डोळ्यांत निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होती.
    काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं.
    "आता दुकान बंद केलं गं... सकाळी ये, मिळेल."

    Voir plus Voir moins
    6 min